हमास आणि इस्रायल यांच्यातल्या शस्त्रसंधी कराराअंतर्गत हमासनं आज गाझा मधून तीन इस्रायली नागरिकांची सुटका केली. हमासनं ७ ऑक्टोबर २०२४ ला केलेल्या हल्ल्यात किब्बुत्झ इथून या तिघांना ताब्यात घेतलं होतं. शस्त्रसंधी नंतरची ही कैद्यांची सहावी देवाणघेवाण आहे.
हमासनं सुटका केलेल्या इस्रायली नागरिकांच्या बदल्यात, इस्रायल आपल्या ताब्यातल्या ३६९ पॅलेस्टिनी नागरिकांची सुटका करणार असल्याचं हमासच्या कैद्यांविषयक माध्यम कार्यालयानं म्हटलं आहे. यामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले ३६ आणि गाझामधल्या ३३३ जणांचा समावेश आहे. दरम्यान इस्रायलनं ओफर इथल्या तुरुंगातून या पॅलेस्टिनी नागरिकांना मुक्त करायला सुरुवात केली असल्याचं वृत्त तिथल्या प्रसारमाध्यमांनी दिलं आहे.