केरळमध्ये निपाह विषाणूचा फैलाव झाला असून, काल मांजेरी आणि कोझिकोड इथल्या वैद्यकीय महाविद्यालयात दोन रुग्णांना दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे या दोन्ही रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांची एकंदर संख्या आठ झाली आहे.
गेल्या रविवारी निपाह विषाणूमुळे बळी गेलेल्या 14 वर्षांच्या मुलाच्या संपर्कात आलेल्या आठ जणांना बाधा झाली नसल्याचं आढळून आलं आहे, असं केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितलं. पंडिक्कड आणि अनक्क्यम पंचायतींमध्ये आरोग्य अधिकाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणात आतापर्यंत 27 हजार 900 हून अधिक कुटुंबांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.