डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

देशातले खेळाडू, प्रशिक्षकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात केंद्र सरकार कटीबद्ध – क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय

देशातले खेळाडू आणि त्यांचे प्रशिक्षक यांना आवश्यक त्या सर्व  सुविधा उपलब्ध करून देण्यात केंद्र सरकार कटीबद्ध असल्याचं केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत पॅरीस पॅरालिम्पिक स्पर्धेतील खेळाडूंचा सन्मान केल्यानंतर बोलत होते. या सुविधांमुळे खेळाडूंना अधिक चांगलं  प्रशिक्षण मिळायला मदत होईल, असं ते म्हणाले. सरकार खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा  सुविधा विकसित करत आहे, या सुविधांमुळे हे खेळाडू सर्व प्रकारच्या सामन्यांत उत्तम कामगिरी करू शकणार असल्याचं त्यांनी सांगितलं.  क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते सुवर्ण पदक विजेती अवनी लखेरा, रौप्यपदक विजेते  मनीष नरवाल आणि प्रणव सुरमा तसंच कांस्यपदक विजेते मोना अग्रवाल, रूबिना फ्रान्सिस आणि राकेश कुमार यांना सन्मानित करण्यात आलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा