खेलो इंडिया अस्मिता साखळी स्पर्धांमुळे राष्ट्रीय स्पर्धांमधला महिलांचा सहभाग वाढला आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी काढले. तिरुअनंतपुरम इथं भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रादेशिक केंद्रा अंतर्गत एका महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. पदक जिंकल्यानं फक्त त्या खेळाडू आणि त्याच्या प्रियजनांचाच सन्मान होत नसून संपूर्ण देशाचा सन्मान होतो असं ते म्हणाले. २०३६ साली होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांच्या पदकतालिकेत पहिल्या १० मध्ये स्थान मिळवण्याचं भारताचं लक्ष असल्याचं त्यांनी नमूद केलं.
Site Admin | October 20, 2024 8:29 PM | Dr. Mansukh Mandaviya