बीड जिल्ह्यात येत्या ३० आणि ३१ डिसेंबर रोजी विघनवाडी ते राजूरी या मार्गावरून रेल्वेची जलदगती चाचणी होणार आहे. या चाचणीदरम्यान रेल्वे मार्गाजवळ कोणीही येवू नये, असं आवाहन रेल्वेच्या अधिकाऱ्यांसह भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
बीडपासून काही अंतरावर असलेल्या राजुरीपर्यंत या बहुप्रतिक्षित रेल्वे मार्गाचं काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे विघनवाडीपासून राजूरीपर्यंतच्या या नवीन लोहमार्गाची जलदगती चाचणी येत्या सोमवार-मंगळवारी होणार आहे. सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत नियोजित असलेल्या या चाचणीदरम्यान, नागरिकांनी या रेल्वे मार्गापासून दुर राहावं, तसंच पाळीव प्राणी रूळावर येणार नाहीत याची काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.