डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पती-पत्नीच्या नात्यात दिवाळीच्या पाडव्याचे आज विशेष महत्त्व

प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळीच्या सणामध्ये आज बलिप्रतिपदा अर्थात विक्रम संवत्सराचा पाडवा साजरा होतो आहे. पती-पत्नीच्या नात्यात दिवाळीच्या पाडव्याचे विशेष महत्त्व असून व्यापारी वर्गाच्या नवीन आर्थिक वर्षाची सुरुवातही आजपासून होते. कृषीवलांच्या संस्कृतीमध्येही बळीराजाची आगळी महती आहे. या काळात गावागावांमध्ये लहान मोठ्या मंदिरातून कार्तिकस्नान अर्थात काकड आरतीची परंपरा जोपासली जाते

 

अश्विनी पौर्णिमा अर्थात कोजागिरी पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेच्या दरम्यान एक महिन्यांच्या कालावधीत होणाऱ्या या काकड आरतीच्या उपक्रमाच्या मध्यावरच दिवाळीचा सण साजरा होतो.तीर्थक्षेत्रात वर्षभर होणाऱ्या उपासनेचा नित्य उपचार पिढ्यानपिढ्या सुरू असणाऱ्या कार्तिक स्नानाच्या निमित्ताने गावागावांमधल्या घराघरात पोहोचतो.संतांच्या पारंपारिक रचनांचे पाठांतर, समूहातून लोक परंपरा जोपासण्याची संस्कृती यातून वाढीस लागते.

 

दिवाळीच्या पाडव्याला गोपाळकृष्णांनी घालून दिलेली अन्नकुट अर्थात गोवर्धन पूजा सर्वत्र केली जाते.निसर्गाच्या सानिध्यात देवतेचे अस्तित्व शोधण्याचा संदेश आणि ऋतुच्या संक्रमणाच्या कालखंडात दिनचर्येत करण्याचा बदल आपोआप यातून साधतो.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा