डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

७ ते ९ डिसेंबर या कालावधीत विधानसभेचं विशेष अधिवेशन

राज्याला स्थिर आणि लोकाभिमुख सरकार देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थोड्या वेळापूर्वी वार्ताहर परिषदेत दिली. ७ ते ९ डिसेंबर या कालावधीत विशेष अधिवेशन घेऊन विधानसभा अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण करून राज्यपालांचं अभिभाषण व्हावं, यासाठीची शिफारस राज्यपालांना केली असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली.

 

महायुतीच्या जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करायच्या आश्वासनाचा पुनरुच्चार त्यांनी केला. नव्या विधिमंडळात विरोधकांची संख्या कमी असली, तरी त्यावरून त्यांचं मूल्यमापन करणार नाही. त्यांनी मांडलेल्या योग्य विषयांचा सन्मान करू, असंही फडणवीस यांनी सांगितलं. 

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा