‘आपल्या आधुनिक प्रजासत्ताकाच्या बांधणीसाठी डॉ आंबेडकरांनी आपलं आयुष्य वेचलं होतं’, असं भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातले स्थायी प्रतिनिधी पर्वतनेनी हरीश यांनी म्हटलं आहे. अमेरिकेत संयुक्त राष्ट्रसंघाच्या न्यू यॉर्क इथल्या कार्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले आणि इतर मान्यवरांनी आपले विचार मांडले.
दरम्यान, १४ एप्रिल २०२५ चा दिवस ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर दिन’ म्हणून साजरा केला जाईल असे आदेश न्यूयॉर्कच्या महापौरांनी दिल्याचं त्यांच्या कार्यालयाने घोषित केलं आहे.
Site Admin | April 15, 2025 2:44 PM | भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर | संयुक्त राष्ट्रसंघ
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात विशेष कार्यक्रम
