विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होत असून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सर्व विभागांनी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या जनजागृतीच्या मोहिमेत सहभागी व्हावं असं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी काल मुंबईत केलं. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक काल त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली; त्यावेळी ते बोलत होते. मतदार जागृतीसाठी येत्या आठ तारखेपासून मतदानाच्या दिवसापर्यंत विशेष मोहीम राबविली जाणार आहे, असं त्यांनी सांगितलं. निवडणूकीसाठी यंत्रणेची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यात 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदारांची नोंदणी झाली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आजवर एकंदर 46 हजार 630 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असून या कालावधीत राज्यात 252 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
Site Admin | November 6, 2024 9:17 AM | एस. चोक्कलिंगम | मतदार जागृती | विशेष मोहीम