डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राष्ट्रीय अतिसार निर्मूलन मोहिमेला आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते प्रारंभ

 

केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांच्या हस्ते काल राष्ट्रीय अतिसार निर्मूलन मोहिमेची सुरुवात करण्यात आली. अतिसारामुळे होणारे बालमृत्यू थांबवणं हा या मोहिमेचा हेतू आहे. दोन महिने चालणाऱ्या या मोहिमेत पाच वर्षांखालच्या बालकांना ओआरएस आणि झिंकची पाकिटं देण्यात येणार आहेत. जलजीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान आणि आयुष्मान आरोग्य मंदिर नेटवर्क यासारख्या उपक्रमांमुळे अतिसारामुळे होणाऱ्या बालमृत्यूचं प्रमाण कमी झाल्याचं जे. पी. नड्डा यांनी यावेळी सांगितलं. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल आणि प्रतापराव जाधव उपस्थित होते.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा