डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

October 10, 2024 7:21 PM

printer

सुप्रसिद्ध टेनिस खेळाडू राफेल नदालची व्यावसायिक टेनिस मधून निवृत्तीची घोषणा

स्पेनचा सुप्रसिद्ध टेनिस खेळाडू आणि २२ ग्रँड स्लॅम्सचा विजेता राफेल नदाल याने आज व्यावसायिक टेनिस मधून आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. समाजमाध्यमांवर पोस्ट केलेल्या एका चित्रफितीत त्याने ही घोषणा केली असून आपल्या कारकिर्दीत क्रीडा रसिकांकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. मालागा इथं येत्या नोव्हेंबरमध्ये होणारी डेविस चषक स्पर्धा नादालची शेवटची स्पर्धा असेल. 
 
 
नादालने त्याच्या टेनिस कारकिर्दीत ९२ एटीपी एकेरी अजिंक्यपदे आणि ३६ मास्टर्स विजेतेपदं जिंकली आहेत. शिवाय सर्व चार एकेरी ग्रँड स्लॅम विजेतेपदं आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा तो जगातला एकमेव टेनिसपटू आहे. 
 
 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा