डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

October 26, 2024 6:39 PM | SPAIN PRESIDENT

printer

स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेड्रो सॅन्चेझ उद्यापासून २९ ऑक्टोबरपर्यंत भारत दौऱ्यावर

स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेड्रो सॅन्चेझ उद्यापासून २९ ऑक्टोबरपर्यंत भारत दौऱ्यावर येत आहेत. याआधी १८ वर्षांपूर्वी स्पेनच्या  तत्कालीन राष्ट्राध्यक्षांनी भारताला भेट दिली होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सॅन्चेझ यांनी अनेक बैठकांमध्ये सहभाग घेतला आहे. भारत दौऱ्यादरम्यान सॅन्चेझ आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये शिष्टमंडळ स्तरीय चर्चा होणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर हेसुद्धा सॅन्चेझ यांची भेट घेणार आहेत. आपल्या दौऱ्यादरम्यान सॅन्चेझ मुंबईतही येणार असून व्यापारी  आणि उद्योजक, तज्ञ आणि चित्रपट उद्योगाला भेट देणार आहेत. सॅन्चेझ यांच्या भारत दौऱ्यामध्ये अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या होणार असून यामुळे भारत स्पेन मध्ये द्विपक्षीय संबंध मजबूत होणार आहेत.  

सर्वाधिक वाचले

सर्व पहा