स्पेनचे प्रधानमंत्री पेड्रो सांचेझ काल रात्री तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांचा हा पहिलाच भारत दौरा असून अठरा वर्षानंतर स्पेनच्या प्रधानमंत्र्यांचा भारत दौरा होत आहे. या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्पेनच्या पंतप्रधानांबरोबर शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा करतील. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर हे देखील स्पेनच्या प्रधानमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. प्रधानमंत्री सांचेझ मुंबईलाही भेट देणार असून तिथं ते व्यापार, उद्योग, विचारवंत आणि चित्रपट उद्योगातील प्रमुखांशी संवाद साधतील. या भेटीदरम्यान अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा असून त्यामुळे द्विपक्षीय सहकार्याला चालना मिळेल, असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.
Site Admin | October 28, 2024 9:44 AM | India | Spain PM Pedro Sanchez