राज्य सरकारनं हमीभावानं सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात १४ डिसेंबरपर्यंत ५५१ खरेदी केंद्रांवर केवळ १ लाख ३१ हजार टन सोयाबीनची खरेदी झाली आहे. शेतकऱ्यांना नोंदणीसाठी १५ डिसेंबरवरून ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य सरकारनं ४,८९२ रुपये प्रतिक्विंटल हमीभावानं सोयाबीन खरेदी करण्याचे निर्देश नाफेड आणि नॅशनल को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लि. या दोन संस्थांना दिले आहेत. ही खरेदी ६७ हजार ७५३ शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. राज्यात यासाठी ५८१ केंद्रांना खरेदीची परवानगी देण्यात आली आहे. त्यातील ५५१ केंद्रं सुरू असल्याची माहिती सहकार आणि पणन विभागानं दिली.
Site Admin | December 16, 2024 10:30 AM | soybean