नैर्ऋत्य मोसमी पाऊस आज विदर्भात दाखल झाला असून पुढच्या दोन दिवसात उर्वरित राज्य व्यापण्याच्या दृष्टीनं स्थिती अनुकूल आहे. कोकण, मध्यमहाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काल पाऊस पडला. येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतेक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज आहे. किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे.
पुढच्या २४ तासांत पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट तर रायगड, रत्नागिरी, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना पावसाचा यलो अर्लट जारी करण्यात आला आहे.