डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

महाराष्ट्रात अमरावतीमध्ये अग्नेय आशियातली सर्वात मोठी वैमानिक प्रशिक्षण संस्था होणार सुरू

अमरावती इथं सुरू केली जाणारी विमान उड्डाण प्रशिक्षण संस्था अग्नेय आशियातली सर्वात मोठी वैमानिक प्रशिक्षण संस्था ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. अमरावती विमानतळ आणि उडान अर्थात उडे देश का आम नागरिक योजनेअंतर्गत अमरावती मुंबई प्रवासी विमानसेवेचा काल प्रारंभ करताना ते बोलत होते. दरवर्षी 180 वैमानिक अमरावतीमध्ये तयार होतील आणि जवळपास ३४ विमानं या संस्थेत उपलब्ध असतील, असं मुख्यमंत्री म्हणाले.
गेल्या १० वर्षांत देशातल्या विमानतळांची संख्या, विमानं आणि हवाई वाहतूक मार्ग यांची संख्या जवळपास दुपट झाली आहे असं नागरी हवाई वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू, यांनी याप्रसंगी सांगितलं. तर २०१४ नंतर देशात ८६ नवीन विमानतळ सुरू झाल्याचं राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमरावतीत विमानतळ सुरू होत असल्याचं स्वागत केलं आहे. या विमानतळामुळे या भागात अर्थव्यवस्थेला आणि दळणवळणाला चालना मिळेल, असं त्यांनी समाजमाध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा