दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यून सुक येओल यांना पोलिसांनी आज अटक केली. त्यानंतर येओल यांना ग्योंगगी प्रांतातल्या ग्वानचेओन इथल्या तपास कार्यालयात नेण्यात आलं आहे. गेल्या महिन्यात त्यांनी मार्शल लॉ जारी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांच्यावर नॅशनल असेंब्लीमध्ये महाभियोग प्रस्ताव मंजूर झाला होता. त्यांच्याविरुद्धच्या राष्ट्रद्रोहाच्या आरोपांची अद्याप चौकशी सुरू असून दक्षिण कोरियात राष्ट्रपतींना अटक होण्याची ही पहिली वेळ आहे.
Site Admin | January 15, 2025 8:43 PM | arrested | South Korean | yun suk yeol