डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 2, 2024 10:36 AM | South Korea

printer

दक्षिण कोरिया राबवणार सायबर सुरक्षा अभियान

दक्षिण कोरिया आपल्या राष्ट्रीय पायाभूत सुविधांचं, सायबर हल्ल्यापासून संरक्षण आणि अफवांचा मुकाबला करणं यासाठी आक्रमक सायबर सुरक्षा अभियान राबवणार आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये सायबर सुरक्षा धोरणाची घोषणा केल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा परिषद ने परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, राष्ट्रीय संरक्षण आणि विज्ञान तसंच माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयासह गुप्तचर संस्था, पोलिस तसंच 14 सरकारी संस्थांसह संयुक्तपणे आखलेल्या राष्ट्रीय सायबर सुरक्षा मूलभूत योजनेचा प्रारंभ केला.

 

या योजनेद्वारे प्रतिकूल शक्तींपासून सायबर अवकाशाचं उत्तम संरक्षण करण्यास मदत होऊ शकते असं राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या सल्लागारांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय सायबर सुरक्षा धोरणाचा विस्तार करण्यासाठी 100 कृतीकार्यक्रमांची घोषणा फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीला केली होती. यापैकी सर्व कृती सार्वजनिकरित्या जाहीर करण्यात आलेल्या नाहीत.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा