उत्तर कोरियाच्या संभाव्य धोक्याचा प्रतिकार करण्याच्या दृष्टीनं दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांनी गेल्या आठवड्यात वॉशिंग्टन इथं युद्ध प्रात्यक्षिक केलं. दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने संयुक्त निवेदनाद्वारे ही माहिती दिली. उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र आणि आण्विक चाचण्या वाढवल्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांनी हे पाऊल उचललं आहे. अमेरिकेत होऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी उत्तर कोरिया काही गैरकृत्य घडवून आणू शकतो अशी चिंता या देशांना वाटत आहे.
Site Admin | September 7, 2024 7:41 PM | South Korea and US | Washington
दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांची वॉशिंग्टन इथं युद्ध प्रात्यक्षिकं
