दक्षिण कोरियाचे वादग्रस्त राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांना, मागच्या महिन्यात त्यांच्या देशात झालेल्या बंडाचं नेतृत्व केल्याप्रकरणात, काल न्यायालयानं दोषी ठरवलं. देशात मार्शल लॉ लागू केल्यानंतर अशा आरोपांचा सामना करणारे ते पहिलेच राष्ट्राध्यक्ष आहेत. येओल यांच्यावर महाभियोग खटला देखील चालवला जात आहे. येओल यांना मदत केल्या प्रकरणात दक्षिण कोरियाचे संरक्षण मंत्री आणि काही पोलीस अधिकाऱ्यांना न्यायालयानं याआधीच दोषी ठरवलं आहे. येओल यांना राष्ट्रध्यक्ष पदावरून औपचारिकरीत्या दूर करण्याबाबत सध्या न्यायालय विचार करत आहे तर नागरिक येओल यांच्यावर महाभियोग चालवण्याच्या मताचे आहेत.
Site Admin | January 27, 2025 12:39 PM | South Korea
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांना बंडाचं नेतृत्व केल्याप्रकरणी न्यायालयानं ठरवलं दोषी
