डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

सोल लीडरशिप कॉन्क्लेव्हच प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

जागतिक पातळीवरचे कल लक्षात घेऊन भारतीय पद्धतीचा अवलंब करणारं नेतृत्त्व भारताला गरजेचं असल्याचं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केलं. आज नवी दिल्लीत पहिल्या स्कूल ऑफ अल्टिमेट लीडरशीप – सोल परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.

 

भारत जागतिक स्तरावर एक शक्तिशाली केंद्र म्हणून उदयाला येत असून देशाला प्रत्येक क्षेत्रात कार्यक्षम नेतृत्वाची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. स्कूल ऑफ अल्टिमेट लीडरशिपची स्थापना ही विकसित भारताच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल असून राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करू शकतील असे नेते यामुळे घडले जातील असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

या परिषदेला भूतानचे प्रधानमंत्री दाशो त्शेरिंग तोबगे देखील उपस्थित होते. सोल ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची संकल्पना असून प्रामाणिक नेत्यांना घडवण्यासाठी प्रधानमंत्र्यांच्या वचनबद्धतेचा हा एक पुरावा असल्याचं ते म्हणाले. आजपासून दोन दिवस चालणारी ही परिषद विविध क्षेत्रातल्या नेत्यांना त्यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास सांगण्यासाठी एक प्रमुख व्यासपीठ असेल.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा