जीवनाच्या विविध क्षेत्रातल्या व्यक्तींना एका मंचावर आणणाऱ्या सोल या दोन दिवसीय नेतृत्व परिषदेच्या पहिल्या आवृत्तीचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या होणार आहे. भूतानचे प्रधानमंत्री दाशो त्शेरिंग तोबगे या परिषदेचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहाणार आहेत.
राजकारण, क्रीडा, कला, माध्यमे, अध्यात्मिक जग, सार्वजनिक धोऱण, व्यवसाय आणि सामाजिक क्षेत्रासारख्या विविध क्षेत्रातील नेते त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल अनुभव सांगणार आहेत.