लवकरच स्वतःचं समुद्रतळ अभियान असलेला जगातला सहावा देश होण्यास भारत सज्ज आहे अशी माहिती भूविज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी दिली आहे. भूविज्ञान मंत्रालयाच्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्यावर चर्चा करण्यासाठी सिंग यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत एक बैठक झाली. या बैठकीत सिंग यांनी समुद्रतळ अभियानाच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केलं. समुद्रतळ अभियानात यश मिळवणाऱ्या मोजक्या देशांमध्ये भारताची गणना होणार असल्याबद्दल अभिमान वाटत असल्याचं सिंग यावेळी म्हणाले.
Site Admin | June 17, 2024 10:48 AM | Deep Sea Mission | डॉ. जितेंद्र सिंग | समुद्रतळ