जनगणनेला विलंब झाल्यामुळे देशातले जवळपास १४ कोटी लोक अन्न सुरक्षा कायद्याच्या लाभापासून वंचित राहिले आहेत, त्यामुळे सरकारने लवकरात लवकर जनगणना करावी अशी मागणी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी केली.
राज्यसभेत शून्य प्रहरा दरम्यान त्या बोलत होत्या. ग्रामीण भागातल्या नागरिकांना ७५ टक्के आणि नागरी भागातल्या नागरिकांना लाभ देणं हे अन्न सुरक्षा कायद्याचं उद्दिष्ट आहे, हा विशेषाधिकार नसून नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे असंही गांधी म्हणाल्या. या कायद्यामुळे देशातल्या लाखो नागरिकांचं उपासमारीपासून संरक्षण झालं असंही त्या म्हणाल्या.