जेजुरी गडावर आज सोमवती अमावस्या यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दुपारी एक वाजता देवाच्या उत्सवमूर्तींचा पालखी सोहळा कऱ्हा स्नानासाठी काढण्यात आला. यावेळी देव संस्थानच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देण्यात आली. भाविकांनी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’, ‘सदांनंदाचा येळकोट’ असा जयघोष करत भंडार्याची उधळण केली. सोमवती अमावस्यनिमित्त जेजुरीत सुमारे चार लाख भाविक दाखल झाले आहेत.
Site Admin | December 30, 2024 7:22 PM