मुख्यमंत्री सौर कृषी योजना २ अंतर्गत वाशीम जिल्ह्यातला पहिला सौर प्रकल्प मंगळूरपीर तालुक्यात हिसाई इथं कार्यान्वित झाला. या प्रकल्पाची क्षमता चार मेगावॅट असून हा अकोला परिमंडळातला तिसरा प्रकल्प आहे. वीस एकर शासकीय जमिनीवर उभारलेला हा प्रकल्प ३३ केव्ही शेलू उपकेंद्राशी जोडलेला आहे. त्यामुळे ३३ केव्ही शेलू उपकेंद्रातून निघणाऱ्या तराळा कृषी वीज वाहिनीवरील नऊ गावातील १०५३ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होईल.
या अगोदर महावितरणच्या ज्या पाच सौरप्रकल्पांचं लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातला जलालाबादचा एक तसंच बुलडाणा जिल्ह्यातला एक अशा दोन सौर प्रकल्पांचा समावेश होता.
Site Admin | November 27, 2024 4:55 PM | cm solar project