सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरण परिसरात करण्यात येणाऱ्या उजनी पर्यटन आराखड्यासाठी आवश्यक २८० कोटी रुपयांच्या कामांना राज्य शासनाच्या उच्च अधिकार समितीने आज मान्यता दिली आहे. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
उजनी धरण पक्षी निरीक्षणासाठी प्रसिद्ध असून इथं अक्वॉटिक टुरिझम आणि वॉटर स्पोर्ट टुरिझम विकसित होऊ शकतं. या ठिकाणी जलतरण तलावाचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पा अंतर्गत धऱण परिसरात मनोरंजन केंद्र, हॉटेल्स, सभागृह, बोर्ड रुम, रॉक पूल, लाईट हाऊस, बोट सफारी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.