सोलापूर बाजार समितीत सोमवारी ३२५ तर ३३४ गाड्या कांदा आवक नोंदवण्यात आली. यावेळी जुन्या कांद्याला प्रतिक्विंटल तीन हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे, तर नवीन कांद्याला सोलापूर बाजार समितीत सोमवारी दोन हजार ते चार हजारांपर्यंत भाव होता. पावसाने भिजलेल्या कांद्याला प्रतिकिलो १० ते १५ रुपयांचा दर मिळाला. सोलापूर बाजार समितीत सध्या नगर, नाशिक, धाराशिव, पुणे जिल्ह्यातून जुना कांदा येत आहे. आवक झालेल्या ३२५ गाड्यांमध्ये २०० गाड्या जुना कांदा होता तर १२५ गाड्या नवीन कांदा होता. काल देखील आवक वाढली होती. म्हसवड, फलटण, माळशिरस, कर्नाटक, बागलकोट, विजयपूर, कलबुर्गी इथून नवीन कांदा सोलापूर बाजार समितीत विक्रीसाठी येत आहे. आवक वाढल्याने १५ दिवसांपूर्वीचा दर सध्या राहिलेला नाही. साडेपाच हजार रुपये क्विंटलने जाणारा कांदा आता आवक वाढल्याने तीन ते पाच हजार रुपयांपर्यंत विकला जात आहे. दर कमी झाल्यानं बळिराजाची चिंता वाढू लागली आहे.
Site Admin | October 9, 2024 7:21 PM | Onion Market | Solapur