सोलापूर जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ च्या १ हजार १९ कोटी ३३ लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्याला जिल्हा नियोजन समितीनं आज मान्यता दिली आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या आज झालेल्या बैठकीनंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ही माहिती दिली.
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सर्वसाधारण योजना ८६१ कोटी ८९ लाख, अनुसूचित जाती उपयोजना १५२ कोटी, तर आदिवासी क्षेत्राबाहेरच्या उपयोजना ५ कोटी ४४ लाख रुपयांचा समावेश आहे. हा प्रारूप आराखडा राज्य समिती समोर सादर करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीनं मान्यता दिल्याचे त्यांनी सांगितलं.
जिल्हास्तरीय आकस्मिक पाणी वापर समितीची बैठकही जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी त्यांनी सोलापूरसह अन्य शहरासाठी पिण्याच्या पाण्याची दोन आकस्मिक आरक्षणं मंजूर केली. नागरिकांनी पाणी काटकसरीनं वापरून बचत करावी, असं आवाहनही त्यांनी केलं.