सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला इथं काल रात्री दुचाकी आणि बैलगाडी यांच्यात झालेल्या अपघातात बैलासह दुचाकीवरचे दोन तरुण जागीच ठार झाले. हे दोघेही मोहोळ तालुक्यातल्या पापरी इथले रहिवासी होते. अपघातात धायटी इथला बैलगाडी चालकही जखमी झाला आहे. बैलगाडी रत्नागिरी-सोलापूर महामार्ग ओलांडून सांगोल्याच्या दिशेनं जात असताना सोलापूरच्या दिशेनं चाललेली दुचाकी बैलगाडीवर आदळून हा अपघात झाला.
Site Admin | February 23, 2025 5:06 PM | Solapur Accident
सोलापुरात दुचाकी आणि बैलगाडीच्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू
