सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर शहराजवळ काल सायंकाळी झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले आहेत. सोलापूरकडून हैद्राबादकडे जाणाऱ्या एका वाहनानं, रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकींना धडक दिल्यामुळे हा अपघात झाला.
दुचाकीस्वारांना धडक दिल्यानंतर दुभाजक ओलांडून वाहन एका मोटार गॅरेजवर आदळलं त्याचवेळी रस्त्यावरुन येणाऱ्या अनेक वाहनांनाही धडक बसली. या अपघातात गंभीर जखमी असलेल्या चौघांवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.