डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 4, 2024 6:56 PM | shobhna ranade

printer

ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या शोभना रानडे यांचं पुण्यात निधन

ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या शोभना रानडे यांचं आज सकाळी पुण्यात  निधन झालं. त्या १०० वर्षांच्या होत्या. शोभना रानडे यांनी निराधार महिला आणि मुलांसाठी समाजकार्य केलं. भारत सरकारनं २०११ मध्ये त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं.

पुण्यात आगा खान पॅलेस इथं गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटी आणि प्रशिक्षणासाठी महिलांकरिता एक संस्था स्थापन करण्यात त्यांनी मदत केली. बालग्राम महाराष्ट्र नावानं एक मुलांचं गाव त्यांनी सुरू केलं त्याद्वारे शेकडो अनाथ मुलांना आसरा मिळाला. गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटीच्या माध्यमातून गंगा वाचवा चळवळीत शोभना रानडे यांचा सक्रिय सहभाग होता.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा