डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना पाच महिन्यांचा कारावास

सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्लीतल्या न्यायालयाने वीस वर्षांपूर्वी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याप्रकरणी पाच महिन्यांचा कारावास ठोठावला आहे. दिल्लीचे सध्याचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी हा खटला दाखल केला होता. मेधा पाटकर यांनी आपल्याबद्दल प्रसिद्दीपत्रकाद्वारे अपमानजनक मजकूर प्रसिद्ध केल्याचा आरोप करत सक्सेना यांनी २००१ साली गुजरातमधल्या अहमदाबाद न्यायालयात याचिका दाखल केली होती. हा खटला २००२ मध्ये दिल्ली न्यायालयात वर्ग करण्यात आला होता. याप्रकरणी २५ मे रोजी नवी दिल्लीतल्या दक्षिण जिल्हा न्यायालयाने पाटकर यांना दोषी ठरवलं होतं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा