भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त कालपासून राज्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. त्या अंतर्गत सर्व शाळा महविद्यालयांमधे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. या सप्ताहादरम्यान ११ एप्रिल रोजी म्हणजे येत्या शुक्रवारी क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात येणार असून भारतीय संविधान, मूलभूत अधिकार आणि कर्तव्यं याबाबात प्रबोधनपर व्याख्यानं, कार्यशाळा, रक्तदान शिबिरं, ज्येष्ठ नागरिक आणि महिला मेळावे, स्वच्छता अभियान असे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. येत्या १४ एप्रिल पर्यंत हा सप्ताह चालेल.
Site Admin | April 9, 2025 2:57 PM | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती | सामाजिक समता सप्ताह
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सामाजिक समता सप्ताहाचं आयोजन
