छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या विविध शाळांमध्ये सध्या १७ हजारावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून मनपाच्या शाळेत स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
‘‘या प्रकल्पांतर्गत मनपा शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बैठक व्यवस्था, स्मार्ट क्लासरूम, सिंथेटिक टर्फ सह क्रीडांगण, आदी भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी सावित्री एज्युकेशन कंट्रोल रूम कार्यान्वित करण्यात आली, तर विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी गुणवत्तेची पंचसूत्री हा प्रकल्प राबवला जात आहे. या विविध उपक्रमांमुळे मनपाच्या सिल्क मिल प्राथमिक शाळेची केंद्र शासनाने PM Shri स्कूल म्हणून तर नारेगाव आणि बनेवाडी इथल्या दोन शाळांची, राज्य शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा म्हणून निवड केली आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात मनपाच्या किराडपुरा शाळेला गौरवण्यात आलं आहे.’’