स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०२४च्या सॉफ्टवेअर फेरीत राज्यातल्या संघांनी चमकदार कामगिरी केली आहे. या फेरीत कन्व्हर्सेशनल इमेज रेकग्निशन चॅटबॉट’, ‘महिला सुरक्षा’, ‘ट्रॅफिक व्यवस्थापनासाठी एआय आधारित उपाय’, ‘लाइव्ह लोकेशन ट्रॅकिंग आदी मुद्यांवर या संघांनी उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. यात मुंबईच्या वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, नागपूरच्या यशवंतराव चव्हाण इंजिनिअरिंग, नवी मुंबईतल्या दत्ता मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या जेएनईसी तसंच राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बक्षीसं पटकावल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
Site Admin | December 14, 2024 10:25 AM | SMART INDIA HACKATHON | Smart India Hackathon 2024 | Software Round Brilliant Performance