नागपूरच्या हिंगणा येथील जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनच्या सातव्या अंतिम फेरीचा समारोप आज पार पडला.
या स्पर्धेतील ज्यूरी सदस्यांनी केलेल्या मूल्यांकनावर आधारित, कौशल्य विकास मंत्रालयाने दिलेल्या ४ समस्यांवर उपाय सुचवणाऱ्या संघांना विजेते घोषित केले. विजेत्या संघांत श्री साईराम अभियांत्रिकी महाविद्यालय चेन्नई, व्यंकटेश्वरा कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग बंगलोर, एक्रोपोलिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च इंदूर आणि वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आंध्र प्रदेश यांचा समावेश आहे.
Site Admin | December 13, 2024 7:47 PM | Nagpur | Smart India Hackathon 2024