मुंबईतल्या प्रा. एल.एन. वेलिंगकर व्यवस्थापन विकास आणि संशोधन संस्थेमध्ये येत्या ११ आणि १२ डिसेंबर २०२४ रोजी ‘स्मार्ट इंडिया हॅकथॉन’ या राष्ट्रीय स्तरावरील महाअंतिम फेरीचं आयोजन केलं आहे. शिक्षण मंत्रालय आणि भारतीय तंत्र शिक्षण परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधानमंत्री कार्यालयानं हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या वर्षीच्या हॅकाथॉनमध्ये ५४ मंत्रालये, विविध केंद्रीय विभाग आणि उद्योगांनी सादर केलेल्या २५० हून अधिक समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी राष्ट्र प्रेमाला महत्व देण्यात आलं आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून नव्या पिढीला सृजनशील आणि सक्षम बनवण्याचं उद्दिष्ट आहे.
Site Admin | December 9, 2024 6:45 PM | Smart India Hackathon 2024