श्रीलंकेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या यांची निवड झाली आहे. श्रीलंका क्रिकेटच्या कार्यकारी समितीने हा निर्णय घेतल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. नुकत्याच झालेल्या भारत, इंग्लंड तसंच न्यूझीलंडविरुद्धच्या दौऱ्यांमध्ये संघाची कामगिरी लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं समितीने सांगितलं आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत जयसूर्या हे श्रीलंकेच्या संघाचे प्रशिक्षक असतील.