कौशल्यावर आधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचं केंद्र स्थापन करण्यासाठी राज्य शासन आणि एनएसडीसी इंटरनॅशनल लिमिटेड यांच्यात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि अजित पवार, तसंच उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. एनएसडीसी इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीला प्रशिक्षण केंद्रासाठी पुण्यातल्या शासकीय दूरशिक्षण तंत्र निकेतन संस्थेची जागा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
या सामंजस्य कराराचा लाभ राज्यातील युवकांना देशात आणि परदेशात रोजगाराच्या संधी मिळण्यासाठी होणार आहे.
Site Admin | July 30, 2024 8:04 PM | CM Eknath Shinde