वाशिम जिल्ह्यातल्या नागठाना इथे धारदार शस्त्रानं केक कापून वाढदिवस साजरा करत समाजमाध्यमावर त्याचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या सहा जणांना वाशीम ग्रामीण पोलीसांनी नुकतीच शस्त्रासह अटक केली. यात खंजीर,तलवारी,गुप्ती यांच्यासह दोन बंदुकांचाही समावेश आहे. या प्रकरणी भारतीय हत्यार अधिनियमा नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Site Admin | September 4, 2024 5:17 PM