गंगाखेडचे माजी आमदार सीताराम घनदाट यांनी आज भाजपात प्रवेश केला. मुंबईतल्या भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
घनदाट यांच्या बरोबर परभणी जिल्हा परिषदेचे अनेक माजी सदस्य, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंचांसह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे परभणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रसाद बुधवंत, ‘वंचित’ आघाडीचे नेते सुरेश फड, यांच्यासह अनेकांनी भाजपात प्रवेश केला.
रत्नागिरी तालुक्यातल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, तसंच छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही याच कार्यक्रमात भाजपात प्रवेश केला.