भारत आणि सिंगापूर दरम्यानच्या द्विपक्षीय धोरणात्मक संबंधाना ६० वर्ष पूर्ण होत असून, या पार्श्वभूमीवर सिंगापूरचे राष्ट्रपती थरमनषणमुगरत्नम हे आजपासून पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्याबरोबर एक उच्च स्तरीय शिष्टमंडळही येत आहे. या दौऱ्यात राष्ट्रपती थरमन षणमुग रत्नम हे राष्ट्रपती द्रौपदी मुरमू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. तसच १७ आणि १८ जानेवारीला ते ओडिशा राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
Site Admin | January 14, 2025 9:47 AM | Singapore President Tharman Shanmugaratnam
सिंगापूरचे राष्ट्रपती थरमन षणमुगरत्नम पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर
