महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पिंगुळी इथं तीन दिवसीय ठाकर लोककला महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवाचं उदघाटन उद्या सकाळी ११.३० वाजता वाजता सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, पालकमंत्री नितेश राणे आणि खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत होणार आहे. या महोत्सवादरम्यान राधा नृत्य, कळसुत्री बाहुल्या, चित्रकथी, पांगुळ बैल, पोवाडा, पोतराज, तारवागीत आणि डोनागीत यांसारख्या विविध ठाकर लोककला सादर केल्या जाणार आहेत. अशा प्रकारचा लोककला महोत्सव शासनानं पहिल्यांदाच आयोजित केला आहे.
Site Admin | February 21, 2025 7:21 PM | Sindhudurg
सिंधुदुर्गात तीन दिवसीय ठाकर लोककला महोत्सवाचं आयोजन
