भारतातल्या पहिली खोल समुद्रातल्या रॉड फिशिंग स्पर्धेचं आयोजन सिंधुदुर्गाच्या भोगवे, निवतीच्या समुद्रात करण्यात आलं होतं. कोकण एक्स्ट्रीम अँगलर्स या संस्थेनं आयोजित केलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रासह, कर्नाटक, गोवा आणि केरळ या राज्यांतून १२ होड्यांमधून ५९ स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत कर्नाटकच्या टीम मलबारीज या संघाने साडेबारा किलो वजनाचा गोबरा प्रजातीचा मासा पकडून पहिला क्रमांक पटकावला. तर रत्नागिरीच्या रेड मरीन संघाने दुसरा आणि गोव्याच्या लुअर लिजंड या संघाने तिसरा क्रमांक पटकावला. विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं.
Site Admin | December 3, 2024 7:36 PM | Rod Fishing Tournament | Sindhudurg