‘एक देश, एक विद्यार्थी ओळख’ या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या ‘अपार’ अर्थात ऑटोमेटेड परमनंट अकॅडमी अकाउंट रजिस्ट्री नोंदणीत सिंधुदुर्ग जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. अहिल्यानगर दुसऱ्या स्थानावर तर रत्नागिरी तिसऱ्या क्रमांकावर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ लाख ६८ हजार ३४ विद्यार्थ्यांपैकी ८ लाख १९ हजार ९५ विद्यार्थ्यांची ‘अपार’ नोंदणी पूर्ण झाली आहे. अपारच्या माध्यमातून देशातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा स्वतंत्र ओळख क्रमांक आणि सोबतच डिजिलॉकरची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
Site Admin | December 12, 2024 3:52 PM | Sindhudurg
‘अपार’ नोंदणीत सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात प्रथम
