सिक्कीममधील गंगटोक इथं आज ईशान्येकडील ऊर्जामंत्र्यांची परिषद होत आहे. केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल या परिषदेत सहभागी होणार आहेत.
ईशान्येकडील राज्यांचे सर्व ऊर्जामंत्री आणि वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. परिषदेत या भागातील वीज क्षेत्रातील विविध पैलूंवर चर्चा होणार आहे.