राज्यात गारठा वाढला असून गेल्या चोवीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट झाली. मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तापमानात किंचित घट झाली. राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर इथं ९ पुर्णांक ४ दशांश अंश सेल्सियस इतकं नोंदवलं गेलं.
नाशिकमध्ये १० पूर्णांक ६ दशांश अंश सेल्सियस तर निफाडमध्ये ८ पुर्णांक ४ दशांश अंश सेल्सियस तापमान आज नोंदवलं असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे.