श्रावण महिन्याचा प्रारंभ आजपासून, म्हणजे श्रावणी सोमवारपासून होत आहे. यानिमित्त राज्यातल्या ज्योतिर्लिंगांच्या विविध प्रमुख शिवमंदिरांसह ठीकठीकाणच्या शिव मंदिरांमध्ये भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली आहे. दरम्यान, श्रावण महिन्यात एसटी महामंडळानं ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. महामंडळाच्या राज्यातल्या विविध आगारांमध्ये हा उपक्रम राबवला जाईल; या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, आणि महिलांना मोफत किंवा माफक दरात तीर्थाटनाचा आनंद घेता येईल. प्रवाशांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असं आवाहन एसटी महामंडळानं केलं आहे.
Site Admin | August 5, 2024 10:16 AM | Shravan | ST
एसटी महामंडळातर्फे ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ हा अभिनव उपक्रम
