दिल्ली आणि परिसरात आज सकाळी हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे तापमानात घट झाली असली तरी दृश्यमान्यता सुधारली आहे. दिल्लीत संध्याकाळपर्यंत पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं दिली आहे. पश्चिमेला होत असलेल्या हवामान बदलाचा फटका राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीला बसत असल्याची माहिती हवामान संशोधक डॉ. आरके जेनामनी यांनी दिली.
Site Admin | January 16, 2025 2:08 PM | दिल्ली | हवामान